पावसामुळे विधानसभेचे आजचे कामकाज रद्द

नागपूर : पोलीसनामा  ऑनलाईन

नागपुरात सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले आहे. काल पासून नागपूरमध्ये  पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु झाले होते. पण नागपूर विधानभवनात मोट्या प्रमाणात पाणी साचलं आहे. जेथून वीज पुरवठा केला जात त्याच रूम मध्ये गुढघ्या इतकं पाणी साचलं आहे. या  पावसामुळे विधानसभेचे आजचे कामकाज रद्द करण्यात आले आहे, आशी घोषणा विनोद तावडेंनी केली.

[amazon_link asins=’8179925919′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec939f88-80df-11e8-9c09-318d51a23683′]

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज थांबवावे लागले आहे.अधिवेशनाचे अध्यक्ष आणि इतर नेते विधानभवनाची पाहणी करून गेले आहेत. तेथील साचलेलं पाणी काढण्यासाठी पंपचा वापर केला जात आहे.

“सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा फटका पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. आणि नागपुरात अधिवेशन घेण्यापूर्वी आम्ही ते मुंबईला अधिवेशन घ्यावं असा अहवाल दिला होता. मुंबईमध्ये जरी पाऊस झाला तरी सरकारी यंत्रणा तेथे मोट्या प्रमाणात आहेत. मुंबईमधून  सर्व  यंत्रणा नागपुरात आणण्यासाठी होणार खर्च हि कमी झाला असता, तसेच आमदारांसाठी असलेले बंगले सुद्धा गळत आहेत”. असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणालेत.