‘आप’ आमदाराकडून महिलेवर कार्यालयातच बलात्कार

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – दिल्लीतील आपचे आमदार महेंद्र गोयल यांच्यासह भावावर प्रशांत विहार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत विहार येथे राहणाऱ्या एका महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांनी महिलेवर कार्यालयातच बलात्कार केला. त्यानंतर तिला गोयल यांनी धमकावल्याचेही तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पिडीत महिला ही सेक्टर २४ मधील रोहीणी परिसरात राहण्यास आहे. १० वर्षांपुर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. तर मागील पंधऱा वर्षांपासून तिची आणि गोयल यांची ओळख आहे. २ वर्षांपुर्वी ती आमदार गोयल यांच्या १३ रोहीणी स्थित घरी पेशनच्या कामानिमित्त गेली होती. त्यावेळी ते घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा मोबाइलही हिसकावून घेतला. त्यानंतर एक महिन्यानंतर तिच्यावर कार्यालयातही बलात्कार केला. असे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर गेल्या महिन्यात ५ फेब्रुवारी रोजी गोयल यांच्या भावाने तिला व्हाटस अपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले. त्यासोबत तिच्यावर शरीर संबंधांसाठी दबावही टाकला असे महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याबाबत तिने स्थानिक नेत्यांकडेही मदत मागितली. तेव्हा त्यांनी माफी मागितली होती. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली नाही, असे महिलेने सांगितले.

प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी गोयल यांच्यासह भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु मी महिलेला ओळखतो. तिचा आरोप खोटा आहे. ही महिला लोकांकडून पैसे घेते आणि ते परत करत नाही. याबाबत तिच्यावर गुन्हे दाखल असल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे.