सासरच्यांनी हाकलले तरी दुसऱ्या ठिकाणाहून विवाहिता दाखल करू शकते खटला : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांकरिता सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. आता महिलांना सासरऐवजी दुसऱ्या ठिकाणी राहून देखील पती आणि सासरच्या मंडळींविरोधात खटला भरता येणार आहे.

उत्तर प्रदेशात एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. विवाहित महिला हुंड्यामुळे त्रासलेली असताना ती सासरच्या घराऐवजी दुसऱ्या ठिकाणाहून देखील पती आणि सासरच्या मंडळींविरोधात खटला दाखल करू शकते. याबाबतचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिला आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महिलांसाठीचा हा महत्वपूर्ण निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की जिथे महिला लग्नाआधी राहत होती , जिथे ती शरणार्थी आहे तेथून विवाह छळासंदर्भात खटला महिलेला दाखल करता येणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. या निर्णयामुळे आता महिला सासर सोडून आल्या असल्या तरी त्या राहत असलेल्या ठिकाणावरून देखील सासरच्या लोकांविरोधात खटला भरू शकतात. उत्तर प्रदेशातल्या रुपाली देवी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.