विद्यार्थ्यासोबत वर्गातच ठेवले शिक्षिकेनं ‘संबंध’, नंतर ‘घरी’ घेवुन गेली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक विवाहित शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवत असे. तसेच ती त्याला घरी आणि बागेमध्ये देखील घेऊन जात असे. याप्रकरणी न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली आहे. ओलिविया असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी हा 16 वर्षांचा असताना तिने त्याच्याबरोबर पहिल्यांदा संबंध बनविले होते. त्यानंतर आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे म्हणत त्याच्याबरोबरच संबंध तोडून टाकले. मात्र त्यानंतर तिच्या पतीबरोबर देखील तिचा घटस्फोट झाला. अन्य विद्यार्थ्यांबरोबर देखील तिचे संबंध आहे कि नाहीत याचा पोलीस तपास करत आहेत. कोर्टाने तिला शिक्षा सुनावली असून अन्य ठिकाणी काम करण्यास देखील तिच्यावर बंदी घातली आहे. वॉशिंग्टनमध्ये नियमानुसार सेक्स करण्याचे वय हे 16 असून शिक्षिका किंवा प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींसाठी हे नियम फार कडक आहेत.

दरम्यान, आपल्या पतीला धोका दिल्याचे तिने कोर्टात मान्य केले असून 2016 मध्ये तिला याप्रकरणात अटक करण्यात आली होती.

Visit : Policenama.com