धक्कादायक… पुण्यात विनयभंग करणाऱ्यास प्रतिकार केल्याने महिलेवर चाकू हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षाभरापासून त्रास देणाऱ्या तरुणाला प्रतिकार केल्याने त्याने चाकूने एका महिलेवर भर दुपारी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अलंकार पोलिसांनी हुसेन खान (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीतील महाराष्ट्र मेडिकल समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी दीड वाजता घडला.

या प्रकरणी वारजे येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही महिला आणि हुसेन खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या एक वर्षापासून  हुसेन त्रास देत आहे. ही महिला गुरुवारी दुपारी डहाणुकर कॉलनीतील रस्त्यावरुन पायी जात असताना हुसेन खान हा पाठीमागून आला व त्याने या महिलेला मागून पकडले. त्यांनी विरोध करुन आपली सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चाकू काढला व त्यांच्या हातावर वार करुन जखमी केले. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो पळून गेला.

चुलत भावानेच केला तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार :- भावाच्या नात्याने राहणाऱ्याने आपल्या बहिणीच्या तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही महिला पती व आपल्या मुलीसह जयभवानी नगर येथे राहते. हा प्रकार २१ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान महिलेच्या घरी घडला आहे. या महिलेचा चुलत भाऊही तेथेच राहतो. त्याने घरी कोणी नाही. हे पाहून त्याने तीन वर्षाच्या मुलीचे कपडे काढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या मुलीला त्रास झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. कोथरुड पोलिसांनी चुलत भावाला अटक केली आहे.

जाहिरात