धक्कादायक…पेटत्या कार मध्ये होरपळून महिलेचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
कारला आग लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना हिंजवडी परिसरात सोमवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान, कार अपघातात महिलेचा मृत्यु झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

संगिता मनिष हिवाळे (44) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेसह त्यांचा मुलगा सायमन मनिष हिवाळे (15), माया डॅनियल बोर्डे (65) आणि जॉन डॅनियल बोर्डे (40) हे कारमध्ये होते.कारला अचानकपणे आग लागली. त्यामध्ये इतरांची सुटका करण्यात आली मात्र कारचे दार लॉक झाल्याने संगिता कारमध्येच अडकल्या. त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्यू झाला. संगिता यांचा आगीत भाजुन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी नोंद पोलिस दप्‍तरी करण्यात आली आहे. कारला अचानकपणे आग कशी लागली याचा देखील तपास करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B01D4EYNQA,B01D4EYNUG,B01CZVRB3K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b544374-b4b4-11e8-a15d-a1a406ed2fa9′]
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी उप अग्निशमन केंद्राचे फायरमन नामदेव म्हेत्र, विठ्ठल सकपाळ, संजय महाडीक, सचिन पाटील, सरोज पुंडे, अवधूत आल्हाट, विशाल पोटे, नवनाथ शिंदे, प्रतिक जराड, महेश चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवत महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि   कायदेशीर कारवाई सुरु केली.