प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. १८ सप्टेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती.

जयश्रीचा राजेंद्र बिरूनगे यांच्याशी विवाह झाला होता. दोघेही खानापूर तालुक्‍यातील मोही येथे रहात होते. तेथील रामचंद्र जाधव यांच्या यांच्या शेतात दोघेही काम करत होते. त्यांच्यापूर्वी जयश्री सुंदर उर्फ महेशकुमार सत्यवर सिंह व फरारी संशयित निरजकुमार शर्मा देखील त्याच ठिकाणी कामाला होते.

हे सर्व एकाच शेतात काम करत असल्याने सुंदर आणि जयश्री यांचे अनैतिक संबंध जुळले होते. त्याची माहिती जयश्रीचा पती राजेंद्र यास झाली होती. त्यामुळे राजेंद्र हा मद्यप्राशन करून तिला वारंवार माराहण व शिवीगाळ करत होता. दरम्यान, ही बाब शेतमालक रामचंद्र जाधव यांना समजल्यानंतर त्यांनी सुंदर आणि निरजकुमार या घटनेपूर्वी दोन महिने अधिच कामावरून काढून टाकले. तरीही राजेंद्र हा जयश्रीस वारंवार मारहाण करत होता. त्यामुळे जयश्री हिने कंटाळून सुंदर यास पती खून करण्याचे सांगितले.

खून करून लग्न करण्याचीही चर्चा झाली. त्यानुसार १८ सप्टेंबर २०१६ रोजी सुंदर आणि त्याचा मित्र निरजकुमार हे जयश्रीच्या घरी आले. राजेंद्र झोपेत असताना गोठ्यातील फरशीने त्याच्या डोक्यात घातली. त्यातच राजेंद्र याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह गुंडाळून झुडपाता फेकून देण्यात आला. त्यानंतर जयश्रीने तिचा स्वतःच्या आणि पतीच्या मोबाईलमधील सीमकार्ड जाळून टाकले.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी जयश्रीने पती बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी घराजवळील झुडपात मृतदेह मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. सखोल तपास केल्यानंतर जयश्री आणि सुंदर यांचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यातूनच हा खून झाल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार जयश्री हिची चौकशी करण्यात आली. तिने सुंदर व निरजकुमार यांच्या मदतीने पतीनचा खून केल्याची कबुली दिली.

सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार ही शिक्षा सुनावण्यात आली. पोलिस कर्मचारी गणेश वाघ, रमा डांगे, वंदना मिसाळ, विटा पोलिस ठाण्याचे श्री. ओंबासे, श्री. सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे