Wonder Seeds For Health | हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी या 4 बियांचे करा सेवन, होतील आश्चर्यकारक आरोग्य लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Wonder Seeds For Health | दैनंदिन जीवनात आपण जे काही करतो त्यात हार्मोन्सची भूमिका मोठी असते. जसे कधी झोपावे, काय खावे, किती वेळ चित्रपट पहावा, म्हणजेच दिवसभरात जे काही संकेत मिळतात ते सर्व काही हार्मोन्समुळे घडते. मासिक पाळीचे नियमन करण्यापासून ते भूक नियंत्रित करण्यापर्यंत हार्मोन्स जबाबदार असतात (Wonder Seeds For Health). त्याचवेळी, आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, पोषक तत्वांची कमतरतेमुळे, इतर आरोग्य समस्यांमुळे हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. हार्मोनल आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी कोणता आहार घ्यावा हे जाणून घेऊया (Health Care Tips).

 

1. सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds)
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि सेलेनियमचा चांगला स्रोत आहेत. त्या प्रोजेस्टेरॉन वाढवतात. या बिया भिजवून फळांसोबत खाऊ शकता किंवा स्मूदी आणि दह्यामध्ये घालू शकता.

 

2. भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)
या बियांमध्ये ओमेगा 3, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. भोपळ्याच्या बिया सॅलड आणि स्मूदीमध्ये टाकू शकता. याशिवाय या बियांचे सेवन फळांसोबत किंवा बटरमध्ये मिसळून करू शकता. (Wonder Seeds For Health)

 

3. चिया सीड्स (Chia Seeds)
या बियांमध्ये ओमेगा 3, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. चिया सीड्स मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यासाठी ओळखल्या जातात. या बिया किमान दोन तास भिजवून ठेवा, मग तुम्ही त्या स्मूदी, दही किंवा फळांसोबत खाऊ शकता.

4. जवस (Flax)
जवसाच्या बिया ओमेगा 3 आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. त्या प्रजनन क्षमता वाढवण्यास आणि इस्ट्रोजेन उत्पादनास मदत करतात. दही, सॅलड, स्मूदी आणि ताक यामध्ये भाजलेले जवसाच्या बिया खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Wonder Seeds For Health | balance your hormones with these five wonder seeds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

 

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !