गळफास घेऊन कंपनीतील कामगाराची आत्महत्या

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड जवळील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या कापसाच्या गोदामात एका कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 8) सकाळी उघडकीस आली मकनू उर्फ रणजित कांता भारद्वाज (वय-39) असे आत्महत्या केलेल्या कामगारांचे नाव आहे. त्याने बंद गोडाऊन मध्ये रात्रीच्या वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कंपनीचे रखवालदार रवींद्र शुक्ला यांनी पोलीसांना दिली.

मात्र हा कामगार बंद गोडाऊन मध्ये रात्री गेला कसा, याची कंपनीत चर्चा असून त्याच्या आत्महत्येचे कारण अजून कळलेले नाही. सदर कामगार गायकर यांच्या ठेकेदारीत काम करत असल्याचे काही कामगारांनी सांगितले

याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुरबाड पोलीस करत आहेत

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like