लहान मुलांनाही असू शकतो ‘ब्रेन ट्युमर’ ! ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोणताही आजार हा अचानक उद्भवत नाही. या आजारांची लक्षणे काही दिवस अगोदर इशारा देतात. परंतु, ही लक्षणे ओळखता येणे खुप आवश्यक आहे. अनेकदा किरकोळ दुखणे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अगदी मोठमोठ्या आजारांचे संकेत अगोदरच मिळतात. कॅन्सरचेही तसेच आहे. याची लक्षणे वेळीच ओळखता आली तर योग्यवेळी उपचार करून तो बरा करता येणे शक्यत असते.

माणसाच्या शरीरात होणार्‍या कॅन्सरपैकी 40 टक्के कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचतात. अनेकदा लहन मुलांनाही हे आजार होतात. या गंभीर आजाराची काही लक्षणे असून लहान मुलांमध्ये त्याची कोणती लक्षणे दिसतात याची आपणे माहिती घेवूयात.

ही आहेत लक्षणे

1 चक्कर येणे, उलटी-मळमळ वाटणे

2 मुलांना नीट चालता न येणे, नीट बोलता न येणे

3 स्नायूंमध्ये कमजोरी, स्पर्श न जाणवणे, धुसर दिसणे

4 शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी

5 मुलांना तीव्र आणि सातत्याने होणारी डोकेदुखी