फक्त बाळासाठीच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठी स्तनपान ठरतं फायदेशीर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बाळाला जन्म देणं हे निसर्गानं स्त्रीला दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे. असं म्हणतात की, बाळाला जन्म दिल्यांतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो. यानंतर स्त्रीच्या शरीरातही अनेक बदल होतात. याशिवाय बाळाला स्तनपान करणं हा महिलेसाठी सर्वात सुखद अनुभव असतो असं म्हणतात. विशेष म्हणजे याचे फायदे बाळालाच नाही तर आईलाही होत असतात. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

स्तनपानाचे बाळाला होणारे आरोग्यदायी फायदे –

– पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचं दूधच हवं असतं. असं म्हणतात की, आईचं दूध बाळासाठी अमृतासमान असतं. यामुळं बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकासही वेगानं होतो.

– रिसर्चनुसार बाळाला ज्या पोषकतत्वाची आणि पोषणाची आवश्यकता असते ती सर्व तत्वे फक्त आईच्या दूधातच असतात.

– खास बात म्हणजे आईच्या दूधात मुबलक प्रमाणात अँटीबॉडीज असतात. यामुळं बाळ अनेक आजार आणि इंफेक्शन पासून दूर राहतं.

– स्तनपान करताना आई आणि बाळ भावनात्मक पद्धतीने जोडले जातात. त्यामुळं स्तनपान करण्याचे भावनात्मक फायदेही होतात. रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे.

स्तनपानाचे आईला होणारे आरोग्यदायी फायदे –

– आईला ब्रेस्ट कन्सर आणि इतरही अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो.

– शरीरातील अतिरीक्त कॅलरीज दूर होतात. यामुळं वजन कंट्रोल राहतं.

– शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. यामुळं प्रेग्नंसीनंतर गर्भाशय आणि शरीराला पुन्हा त्याच अवस्थेत आणण्यास मदत होते.