‘अमेझॉन’चे ‘जेफ बेजोस’ नाही राहिले आता सर्वात श्रीमंत ! ‘या’ व्यक्तीनं पुन्हा मिळवलं नंबर 1 चं स्थान, जाणून घ्या टॉप 5 अब्जाधीश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात मोठे श्रीमंत राहिलेले नाहीत. त्यांची ही जागा मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर बिल गेट्स यांनी घेतली आहे. ते पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती झाले आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये बिल गेट्सला मागे सोडणारे जेफ बेजोस शुक्रवारी दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. सध्याच्या वेळी बिल गेट्स यांचा नेटवर्थ 110 अरब डॉलर (जवळपास 7.89 लाख कोटी रुपये) झाला आहे. तर जेफ बेजोस यांचा नेटवर्थ 109 अरब डॉलर (जवळपास 7.82 लाख कोटी रुपये) आहे.

हे कसे झाले –
जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने मागील महिन्यात 10 अरब डॉलरची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कारणाने कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली. ज्याचा परिणाम बिल गेट्स यांच्या नेटवर्थवर झाला.

अमेरिकन संरक्षण विभागाने 25 ऑक्टोबरला मायक्रोसॉफ्टला 10 अरब डॉलरचा क्लाउड कंप्युटिंग कॉन्ट्रॅक्ट दिले होते. तेव्हापासून मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 4 टक्के तेजी आली आहे. या दरम्यान अमेझॉनच्या शेअरमध्ये 2 टक्के घसरणं आली आहे. यावर्षी मायक्रोसॉफ्टचे शेअर 48 टक्के वाढले आहेत.

हे आहेत जगातील 5 सर्वात श्रीमंत –
1. बिल गेट्स – मायक्रोसॉफ्ट – एकूण नेटवर्थ 110 अरब, जवळपास 7.89 लाख कोटी
2. जेफ बेजोस – अमेझॉन – एकूण नेटवर्थ 109 अरब, जवळपास 7.82 लाख कोटी
3. बर्नार्ड अरनॉल्ड – एकूण नेटवर्थ 103 अरब, जवळपास 7.39 लाख कोटी
4. वॉरेन बफे – बर्कशायर हाथवे – एकूण नेटवर्थ 86.6 अरब, जवळपास 6.21 लाख कोटी
5. मार्क जुकरबर्ग – फेसबूक – एकूण नेटवर्थ 74.5 अरब, जवळपास 5.34 लाख कोटी

Visit : Policenama.com