हीमोफीलिया आजाराबाबत जनजागृती आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन – हीमोफीलिया  हा रक्ताशी संबंधित आजार असून शरीरात रक्त गोठवण्यासाठी असलेल्या १३ घटकांपैकी ८ क्रमांकाचा रक्तघटक हीमोफीलिया ए आणि ९ क्रमांकाच्या घटकाचे प्रमाण कमी झाल्यास हीमोफीलिया बी आजार होतो. हा आजार झालेल्या रूग्णाला एखादी जखमी झाल्यास जखमेतून सतत रक्तस्त्राव होता. कारण या रुग्णाच्या रक्ताची गुठळी तयार होत नसल्याने असे होते. हा आजार दुर्मिळ असून जनजागृती अभावी त्याचे निदान लवकर होत नाही.

हीमोफीलिया असलेल्या रुग्णाला रक्तस्रावाचा धोका जास्त असतो. नियमित तपासणी आणि फॅक्टर रिप्लेसमेंटमुळेच त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. हीमोफीलिया असलेल्या रुग्णाला जर याबाबत माहिती नसेल तर इतर लक्षणे दिसेपर्यंत दीर्घकाळ रक्तस्राव होतच राहतो. मेंदू, किडनी अशा महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तस्राव झाल्यास या आजाराचे गंभीर परिणाम होऊन गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही वेळा अपंगत्वही येऊ शकते. हीमोफीलिया हा आनुवंशिक रक्ताचा आजार आहे. हीमोफीलिया ए (रक्तघटक ८) आणि हीमोफीलिया बी (रक्तघटक ९) या घटकांच्या कमतरतेमुळे हा आजार उद्भवतो.

हीमोफीलियाच्या समस्या लहानपणापासूनच उद्भवतात मात्र काही वेळा त्याचे निदान प्रौढ वयातही होऊ शकते. इतर वैद्यकीय प्रक्रियांच्या आधी एखाद्या तपासणी अहवालात हा अप्रत्यक्षपणे आढळून येतो. हीमोफीलिया बी पेक्षा हीमोफीलिया ए पेक्षा सर्वाधिक लोकांमध्ये आढळून येतो. विकसनशील देशांमध्ये या आजाराबाबत जनजागृती अभाव दिसून येतो. रक्ताच्या गुठळीसाठी आवश्यक असणारा रक्तघटक ८ आणि रक्तघटक ९ हे अनुक्रमे रक्तवाहिनीत इंजेक्शनमार्फत सोडले जातात. यामुळे रक्ताची गुठळी बनवणाऱ्या घटकांची कमतरता भरून निघते. त्यामुळे कापल्यानंतर, एखादी दुखापत झाल्यानंतर, लसीकरणानंतर दीर्घकाळ होणारा रक्तस्राव तसेच नाकातून सतत रक्त वाहणे, लघवी किंवा शौचातून रक्त पडणे, अशावेळी डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेतला पाहिजे.