अमेरिकेच्या राष्ट्रपतींना नव्हे तर ‘या’ देशाच्या प्रमुखांना मिळते सर्वाधिक सॅलरी, ‘हे’ जगातील टॉपचे 5 नेते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रत्येक राष्ट्राध्यक्षांना सॅलरी असते. परंतु, तुम्हाला हे माहिती आहे का, की जगात सर्वाधिक सॅलरी घेणारे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान कोण आहेत ? अशाच टॉप पाच नेत्यांबाबत आपण जाणून घेणार आहेत.

1) जगात सर्वाधिक सॅलरी घेणार्‍या टॉप पाच नेत्यांमध्ये पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. त्यांची वार्षिक सॅलरी 2.81 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.

2) या यादीत चौथ्या स्थानावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. त्यांची एकुण सॅलरी 2.97 करोड रूपयांपेक्षा जास्त आहे.

3) सर्वात जास्त सॅलरी घेणार्‍या नेत्यांच्या यादीत तिसर्‍या स्थानावर स्विस कन्फेडरेशनचे प्रेसिडेन्ट उएली मौरर यांचे नाव आहे. त्यांची वार्षिक सॅलरी 3.59 करोडपेक्षा जास्त आहे.

4) तर या यादीत दुसर्‍या स्थानावर हाँगकॉगचे चीफ एग्झिक्युटीव्ह कॅरी लॅम आहेत. त्यांची वार्षिक सॅलरी 4.22 करोड रूपये आहे.

5) जगातील सर्वात जास्त सॅलरी घेणार्‍या नेत्यांमध्ये पहिल्या स्थानावर सिंगापुरचे पंतप्रधान ली एच लूंग आहेत. त्यांची वार्षिक सॅलरी 11.97 करोड रूपये आहे.