Wriddhiman Saha | कानपूरमध्ये साहाने रचला इतिहास, 75 वर्षानंतर भारतीयानं केली ‘ही’ कामगिरी

कानपूर : वृत्तसंस्था – Wriddhiman Saha | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट (IND vs NZ Test Series) सध्या कानपूरमध्ये खेळली जात आहे. या टेस्टच्या अगोदर मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने 75 वर्षात कोणत्याही भारतीयाला जमली नाही अशी कामगिरी केली आहे.

 

 

ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) 1946 नंतर टीम इंडियाकडून टेस्ट मॅच खेळणारा सर्वात ज्येष्ठ विकेट किपर बनला आहे. साहाचे सध्याचे वय 37 वर्ष 32 दिवस आहे. त्याने कानपुर टेस्टमध्ये माजी भारतीय विकेट किपर फारूख इंजिनिअर (Farooq Engineer) यांना मागे टाकत हा इतिहास रचला आहे. फारूख इंजिनिअर यांनी 36 वर्ष 338 दिवस वय असताना टीम इंडियाकडून टेस्ट मॅचमध्ये विकेट किपिंग केली होती. भारताकडून हा रेकॉर्ड दत्ताराम हिंदळेकर (Dattaram Hindalekar) यांच्या नावावर आहे. त्यांनी 37 वर्ष 231 दिवस वय होते तेव्हा शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. सध्या चालू असलेल्या कानपूर टेस्टमध्ये ऋद्धीमान साहा फक्त 1 रन काढून आऊट झाला.

 

 

बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या ऋद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) 2010 साली
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या टेस्टमध्ये पदार्पण केले होते.
पण, त्याला आधी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि आता ऋषभ पंत (Rishabh Pant)
यांच्यामुळे त्याला कायम टीमच्या बाहेर राहावे लागत होते.
ऋद्धीमान साहाने 11 वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त 38 टेस्ट खेळल्या आहेत.
त्यामध्ये त्यानं 29.09 च्या सरासरीनं 1251 रन केले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 5 अर्धशतक यांचा समावेश आहे.
तसेच त्याने 92 कॅच आणि 11 स्टंपिंगसुद्धा केले आहेत.

 

Web Title :- Wriddhiman Saha | india vs new zealand ind vs nz wriddhiman saha becomes first indian player in 75 years to create this history

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा