‘ये है मोहबतें’ च्या अभिनेत्रींचे गोव्यामध्ये हॉलिडे, स्विमिंग पूल मध्ये केला एन्जॉय

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – नागिन-३ आणि ‘ये है मोहबतें’ मालिकेतील अभिनेत्री करते गोव्यामध्ये एन्जॉय. नागिन ३ मालिकेतील अभिनेत्री तान्या (कृष्णा मुखर्जी) ये है मोहबतें मालिकेतील आदिती भाटिया आणि अनीता हसनंदानी गोवा मध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. त्यांच्यासोबत नागिन ३ मधील हेली दारुवाला पण होती. यामध्ये कृष्णा बिकनी मध्ये दिसून आली.

त्यांच्या या ट्रिप ला अनीता हसनंदानी चे पती पण होते. कृष्णा आणि आदिती ने स्विमिंग पूल मध्ये खुप मस्ती केल्याचे फोटोमध्ये दिसते. गोवा वैकेशन चे हे फोटो व्हायरल झाले आहे. या फोटोत स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करत कृष्णा आणि आदितीचे बॉंडिंग दिसून येते.

या सर्व अभिनेत्रींचा फॅशन सेंस खुप चर्चेत आहे. सगळ्या अभिनेत्रींनी त्यांच्या अकाउंट वर छान स्टनिंग फोटो शेअर केले आहे. अनीता हसनंदानी ने ही इन्स्टाग्राम वर त्याच्या पतीसोबत रोमॅंटिक फोटो शेअर केले आहे. यामध्ये तिने फोटोखाली कॅप्शन दिले आहे की ‘डूब जाऊ तेरी आंखों के ओशन में… स्लो मोशन में’

अभिनेत्री कृष्णा मुखर्जी मालिकामध्ये काम करत आहे. तिला ‘ये है मोहबतें’ मालिकापासून प्रसिद्धी मिळाली आहे. आता ती नागिन ३ मालिकेमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ती नकारात्मक भूमिका साकारत आहे.