Year Ender 2022 | वर्ष 2022 मध्ये ‘हे’ 7 सुपरफूड्स होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या त्यांचे जबरदस्त फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Year Ender 2022 | काही दिवसातच जुने वर्ष संपणार असून नवीन वर्ष सुरू होणार आहे. या वर्षी कोणते सुपरफूड (Superfoods) ट्रेंडमध्ये होते हे तुम्हाला माहिती आहे का? येथे काही सुपरफूड आहेत जे 2022 मध्ये ट्रेंडमध्ये राहिले, हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूया. (Year Ender 2022)

 

1. आवळा (Amla)
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. आवळा इम्युनिटी वाढवण्याचे काम करतो. आवळ्याचा रसही घेऊ शकता. त्यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. तो खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. केस जलद वाढण्यास मदत करते. (Year Ender 2022)

 

2. हळद (Turmeric)
भारतीय जेवणात हळदीचा वापर लोकप्रिय आहे. हळदीमध्ये करक्यूमिन तत्व असते. हळदीचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच ब्युटी रुटीनमध्येही त्याचा समावेश करू शकता. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

 

3. एवोकॅडो (Avocado)
एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट, मिनरल्स, फायबर आणि व्हिटॅमिन असतात. हळदीचा वापर केल्याने सूज, डायबिटीज आणि हार्ट डिसीज इत्यादी दूर ठेवता येतात.

4. हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)
हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात या भाज्यांचे सेवन केल्याने शरीर एनर्जेटिक राहते.

 

5. नट्स (Nuts)
सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यात आयर्न, पोटॅशियम, मँगनीज, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. शेंगदाणे, काजू, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याचा आहारात समावेश करू शकता.

 

6. देशी तूप (Deshi Ghee)
देशी तूप अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरले जाते. रोज १ ते २ चमचे देशी तूप भाकरी, भात किंवा डाळ इत्यादींवर टाकून खाऊ शकता. हिवाळ्यात देशी तुपाचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते.

 

7. ‘बेरी’ज् (Berry)
स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीसारख्या बेरी महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
यातील पोषक तत्त्वे स्तन आणि पोटासारख्या कर्करोगापासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Year Ender 2022 | year ender 2022 these superfoods were in trend in the year 2022 know their surprising benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | स्वत:च्या अंगावर शाई ओतून पुण्यात अनोखं आंदोलन; कारण ठरले चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार