YES BANK कर्ज प्रकरण : अनिल अंबानींना ED ची ‘नोटीस, बोलाविले चौकशीसाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येस बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाबाबत ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांना नोटीस पाठविली असून चौकशीसाठी आज सोमवारी बोलविण्यात आले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकार्‍यांसमोर चौकशीसाठी यावे, असा आदेश त्यांना देण्यात आला आहे. शनिवारी हा आदेश दिला होता. त्यावर अनिल अंबानी यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत आणखी वेळ द्यावा, असे कळविले आहे. जर सोमवारी अनिल अंबानी ईडी अधिकार्‍यांसमोर आले नाही तर त्यांना दुसरे समन्स बजावले जाईल. जर ते आले नाही तर त्यांच्या रिलायन्स कंपनीतील अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येईल, असे ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

You might also like