मुख्यमंत्री योगींनी राम मंदिरासाठी प्रत्येक कुटूंबाकडून ‘या’ गोष्टीची मागणी केल्यानं नवा ‘वाद’

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक परिवाराकडून 11 रुपये आणि एक दगड मागितल्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने राम मंदिरासाठी लोकांनी योगदान द्यावे असे सांगितले आहे.

झारखंडमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी ही मागणी केली. भाजप उमेदवार नागेंद्र महंतो यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले 500 वर्षांपासून सुरु असलेल्या वादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोडवता आले तसेच काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या इतर पार्ट्यांना हा निर्णय सोडवायचा नव्हता असे देखील आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे आता लवकरच अयोध्येत राम मंदिर उभे राहणार असून प्रत्येक कुटुंबाने 11 रुपये आणि एक दगड या निर्मितीसाठी द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. यावेळी आपल्या उमेदवारांसाठी मते मागताना मुख्यमंत्री म्हणाले, मी त्या प्रदेशातून येतो ज्यांनी भगवान राम आणि त्यांच्या शासन व्यवस्थेला ‘रामराज्य’ म्हंटले आहे. याठिकाणी कोणताही भेदभाव न करता सर्वजण एकोप्याने राहतात आणि तेच काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे करण्यात येत आहे.

नव्या कायद्यावरून काँग्रेसवर केला जोरदार हल्ला –
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात अत्याचार झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्याचा आणि निर्वासितांचे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच कॉंग्रेस व इतर स्थानिक पक्ष याचा निषेध करत आहेत.

काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे –
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन पक्षांवर काँग्रेस, झारखंड मुक्ति मोर्चा (जेएमएम) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, या पक्षांना जनतेची सेवा करून सत्ता स्थापन करायची नाही.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/