‘कोलेस्ट्रॉल’पासून वाचण्यासाठी नेमकं काय करावं ? ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात !

पोलिसनामा ऑनलाइन – आजच्या लाईफस्टाईलमध्ये वयोवृद्धांसोबतच तरूणांना देखीली हृदया संबंधित आजार होताना दिसत आहेत. यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंच हृदय रोगांचा धोका वाढतो. आज आपण कोलेस्ट्रॉलबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

फक्त धोकादायकचं नाही कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल हे एक केमिकल कंपाऊंड असतं जे आपल्या लिव्हरमध्ये असतं. शरीराला देखील याची गरज असते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातकच असतं असं नाही. नवीन सेल्स तयार करण्यासाठी आणि हार्मोन्स मॅनेजमेंटसाठी याचा फायदा होतो. परंतु जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा मात्र अडचण होते आणि हृदयासंबंधित आजार होतात.

कधी निर्माण होते अडचण ?

जास्त प्रमाणात फास्ट फूडचं सेवन, ओव्हरइटींग, यांचा लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. जेव्हा आपण एखादं असं काम करतो जे आपलं शरीर सहज स्विकारत नाही तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळं काळजी घ्यायला हवी.

कसं तयार होतं कोलेस्ट्रॉल ?

शरीरात लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते. परंतु रोजच जर कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ खाल्ले तर याचं प्रमाण हळूहळू वाढू लागतं. जेव्हा आपण काही खातो तेव्हा कोलेस्ट्रॉल आपल्या आतड्यात सामावतं. यामुळं अतिरीक्त कोलेस्ट्रॉल आपल्या नसांमध्ये आणि नाड्यांमध्ये जमा होऊ लागतं. यामुळं रक्तप्रवाह विस्कळीत होतो आणि याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

कसं वाढतं कोलेस्ट्रॉल ?

जेव्हा आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज असते तेव्हा लहान आतड्यांमधून ते शोषलं जातं. शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी लिव्हर ते काढून घेतं. परंतु फार जास्त काही खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि शरीरासाठी ते हार्मफुल ठरतं. मेडिकलच्या भाषेत याला एलडीएल म्हणतात. एलडीएल ब्लड सर्क्युलेशनला असं बाधित करतं की, हार्ट आणि ब्रेनवर याचा प्रभाव पडतो. यामुळं जीवाला धोका निर्माण होतो.

अचानक कळत

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आहे याची माहिती एखाद्या आजाराच्या रूपात अचानक मिळते. हाय कोलेस्ट्रॉल समजण्याची काही सिस्टीम नसते. केवळ ब्लड टेस्टच्या माध्यमातूनचे हे कळतं. त्यामुळं वयाची पंचवीशी पार केल्यानंतर प्रत्येक वर्षी एकदा पूर्ण बॉडी चेकअप करायला हवं किंवा ब्लड टेस्ट तरी.

फक्त एवढं करा

वाढत्या वयात जर हृदय आणि मेंदूसंबंधित आजारांचा धोका वाढू द्यायचा नसेल तर आवडीची प्रत्येक गोष्टी खा परंतु त्याचं सेवन प्रमाणात असायला हवं. फास्ट फूड आणि जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. नियमित व्यायाम केला तरीही तुम्ही निरोगी राहता.