कमी वयातही अनेक जीवघेण्या आजारांचे शिकार होतायेत तरुण ! जाणून घ्या ‘कारणं’ आणि ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याच्या काळातील जीवनशैली आणि आहारामुळं कमी वयातच तरूण अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. याची कारण काय आहेत, ते आजार कोणते आहेत आणि यासाठी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात आपण माहिती घेऊयात.

शाळा आणि महाविद्यालयातील तरुण फास्ट फूडचं अतिसेवन करतात. यामुळं शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. शरीरातील फॅट्स वाढतं. अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या वारंवार जाणवतात. यासाठी फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे.

अशाही काही घटना घडल्या आहेत ज्यात 22 ते 30 वयोगटातील मुलांनी हार्ट अटॅकमुळं जीव गमावला आहे. यासाठी महिन्यातून एकदा मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे. जीवनशैली सुधारण्याचीही गरज आहे.

ताण-तणाव, अपुरी झोप यामुळं अनेक तरुणांना रक्तदाबासंबंधित आजार होत आहेत. अशात तरुणांनी योग्य आहार आणि योग्य झोप घेणं गरजेचं आहे. यासाठी रात्री जागण्याचं प्रमाणही कमी होणं आवश्यक आहे. सोशल मीडियामुळंही तरुण रात्र रात्र जागे असतात.

तरुण मुलांना अनेक आजार उद्भवण्याचं आणखी एक मोठं कारण आहे ते म्हणजे डिप्रेशन. कुटुंबाचं टेंशन, नोकरीचं टेंशन, भविष्याची चिंता, वाढलेली स्पर्धा अशा अनेक गोष्टींमुळं डिप्रेशन येऊ शकतं. यासाठी तणाव न घेता तरुणांनी मेहनत आणि योग्य ते प्लॅनिंग करायला हवं.