चाकूच्या धाकानं बलात्कार करून बनवला व्हिडिओ, ‘धमकी’ देऊन पुन्हा माजी सभासदाने केला ‘रेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका मुलीने माजी सभासदावर आपल्या भावाची हत्या करण्याची धमकी देऊन चाकूचा धाक दाखवून आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप लावला. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तिची वैद्यकीय तपासणी केली. ही घटना उत्तरप्रदेशच्या देवबंद येथे घडली. 18 वर्षाच्या मुलीला माजी सभासद आरिफ याने फसवणूक करुन बोलावून दुष्कर्म केल्याचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला.

पीडित मुलीने सांगितले की पहिल्यांदा आमच्या घरी आरिफ गुब्बारा आला. आरिफने तिला सांगितले की माझ्या पत्नीची तब्येत खराब असते. आम्हाला घरकाम करणाऱ्या महिलेची गरज आहे. तो मला त्याच्या घरी घरकाम दाखवायला घेऊन गेला. मी त्याच्या घरात गेले तर तेथे कोणीही नव्हते. त्याने मला बसायला लावून मला प्यायला पाणी दिली आणि काही पैसे दिले.

पीडिताने सांगितले की एकदा आरीफने आमच्या घरी येऊन मला जबरदस्ती माझा व्हिडिओ तयार करुन घेऊन यायला सांगितला, मी घरात गेल्यावर त्याने माझा बलात्कार केला. 10 दिवासांपूर्वी देखील त्याने जबरदस्ती मला माझा व्हिडिओ घेऊन आणून देण्यास सांगितले. जेव्हा मी त्याला बाजारात भेटले तेव्हा त्याने मला त्याच्याकडे बोलावून मला जंगलात नेले आणि बलात्कार केला. मी त्यांच्या कचाट्यातून सुटून कशीबशी घरी आले परंतू त्याने मला धमकी दिली.

पीडित मुलगी त्याच्या धमक्यांना त्रासली होती त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्याआधी त्याने तिला धमकी दिली की तुझ्या भावाची हत्या करेल. या प्रकरणी एस.पी. देहात विधा सागर मिश्र यांनी सांगितले की तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे, त्यानंतर तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.

visit : Policenama.com