अनैतिक संबंधावरुन पत्नीचा खून ; मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या पतीला अटक

दौंड | पोलीसनामा आॅनलाईन

अब्बास शेख

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील चौफुला गावच्या हद्दीमध्ये चोरमले वस्ती येथील विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीची ओळख पटली असून तिचा अनैतिक संबंधावरून खून करून तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली तिच्या पतीने यवत पोलिसांना दिली आहे. मंगळवार दि. ९ रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान विहिरीच्या मालकास अंदाजे १८ ते २० वर्षे वय असणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता.

माझ्या नावे बिग बींवर आरोप करणारे ‘ते’ मेसेज खोटे : सयाली भगत

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’872a35c2-cd23-11e8-b4be-b9715e62e286′]

या घटनेची माहिती, बोरीपारधी गावचे पोलीस पाटील अविनाश अंकुश ठोंबरे यांनी यवत पोलिसांना दिली होती. यावेळी मृत तरुणीची ओळख पटत नव्हती व हा अपघात की खून याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. परंतु यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांना हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचा संशय आला त्यामुळे देवकर यांनी खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. यावेळी या महिलेच्या पतीवर संशय बळावल्याने पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी आपल्या सोबत पो.ह. जितेंद्र पानसरे, पो ना गणेश पोटे,पो. कॉ. विनोद रासकर, पो कॉ कुंजीर, दीपक पालखे, अभिजित कांबळे, महेश बनकर, गणेश झरेकर, विशाल गजरे संपत खबाले, नारायण सोमवंशी यांना सोबत घेईन शिरूर, नाशिक असा प्रवास करून मृत महिलेचा पती राजकुमार कुसावाह याला ताब्यात घेतले.

कारंजा येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ecd78eb-cd23-11e8-a49f-c1feccae3c60′]

आरोपी राजकुमार हा वेगवेगळे ठिकाण बदलून राहत असल्याने त्याचे योग्य ठिकाण सापडत नव्हते. यावेळी पुणे सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांना योग्य मार्गदर्शन व लोकेशन देत आरोपीस पकडण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली. आरोपी राजकुमार कुसावाह याने आपली पत्नी सोनी हिचा अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती यवत पोलिसांना दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर हे करीत आहेत.