खुशखबर ! आता तुमचं वीज बिल होणार कमी, मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता तुमचे वीज बिल कमी होऊ शकते, कारण केंद्र सरकारने राज्य सरकारला वीज युनिट दर कमी करण्याबाबत पत्र लिहिले आहे. स्मार्ट प्री पेमेंट मीटर लावल्याने वीज कंपन्यांचे नुकसान कमी झाले आहे. कंपन्यांना आता आधीच विजेचे पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे त्याची वर्किंग कॉस्ट कमी झालेली आहे. देशात वीज मीटर असलेले 25 कोटी ग्राहक आहेत. त्यामधील दहा लाख लोकांपर्यंत स्मार्ट मीटर पोहचलेले आहे. या दहा लाख लोकांच्या अनुभवानुसार यामुळे कंपनीला चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

याच कारणामुळे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून वीज दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

EESL (Energy Efficiency Services Ltd) चे मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, स्मार्ट मीटरमुळे 200 रुपये प्रत्त्येक मीटरमुळे दर महिन्याला फायदा होत आहे. कंपन्यांनी याचा फायदा ग्राहकांना नक्कीच द्यायला हवा. एका अभ्यासानुसार, देशातील 17% लोक बिल देत नाहीत किंवा संबंधित सरकार त्यांच्याकडून बिलाची रक्कम घेत नाही. जर एक युनिट 5 रुपयांना पकडले तर सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. जर स्मार्ट मीटर 25 कोटी ग्राहकांपर्यंत पोहचले तर हे नुकसान थांबेल.

वीज कंपन्यांना या मीटरमुळे पैसे मिळण्याची खात्री निर्माण झाल्यामुळे वीज कंपन्यांना देखील याचा मोठा फायदा होत आहे. त्यामुळे ते सुद्धा पुढे वीज दर कमी करण्यासाठी सहमत होतील. तसेच स्मार्ट मीटरमुळे बिलासंबंधीच्या तक्रारीतून देखील कंपनीची सुटका झाली आहे.

एनर्जी ग्रिड एक्सपर्ट विनोद फोतेदार सांगतात की, आता कंपनीला मीटर रिडींगसाठी कोणताही माणूस पाठवण्याची गरज पडत नाही. वारंवार वसुलीसाठी देखील जावे लागत नाही. फक्त बिल द्यावे लागते. यामुळे कंपनीचे पैसे देखील अडकून राहत नाहीत. हे सर्व फायदे स्मार्ट मीटर लावल्याने होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कंपन्या याचा ग्राहकांना किती फायदा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यामुळे आता ग्राहकांना वीज बिल कमी होणार असल्याची आशा लागली आहे. केंद्र सरकारने पत्र लिहिल्यानंतर आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/