तुमचा जुना फोन होईल ‘सुपर स्मार्ट’, अँड्रॉइड 11 अपडेटनं होतील हे मोठे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : गुगलने नुकतीच लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 11 लाँच केली आहे. सोबतच स्मार्टफोन बनवणार्‍या कंपन्यांकडून अँड्रॉइड 11 चे अपडेट सर्वसामान्यांसाठी जारी करण्यास सुरू केलीे आहे. यामुळे अँड्रॉइड 11 ची सर्वत्र खुप चर्चा आहे. परंतु, या चर्चेदरम्यान खुपच कमी लोकांना माहिती आहे की, अखेर अँड्रॉइड 11 आल्याने स्मार्टफोनमध्ये कशाप्रकारचे बदल होऊ शकतात. मग जाणून घेवूयात की, अँड्रॉइड 11 आल्याने तुमच्या फोनमध्ये होणारे बदल कसे असतील…

गुगलची ऑपरेटिंग सिस्टम खुप पॉप्युलर आहे, जी सामान्यपण प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वापरली जाते. गुगलकडून यूजर एक्सप्रियन्स आणखी चांगला बनवण्यासाठी वेळोवळी अपडेट जारी केले जातात. यास अँड्रॉइडच्या सीरीजप्रमाणे जारी केले जाते. ज्यास अँड्रॉइड 10, अँड्रॉइड 11 अशा नावांनी ओळखले जाते. गुगलने नवीन ऑपरेटिंग 11 सिस्टमची अपडेट अपकमिंग स्मार्टफोनसोबतच लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मिळेल. मात्र 2जीबी पेक्षा कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 अपडेट सपोर्ट करणार नाही. यासाठी गुगलकडून वेगळा अँड्रॉइड गो सपोर्ट देण्यात आला आहे.

मिळतील हे बदल

1 अँड्रॉइड 11 चे होणारे बदल सर्वात जास्त पॉवर मेन्यूमध्ये दिसतील. म्हणजे होम स्क्रीनवर स्मार्ट होम कंट्रोल, पेमेंट अक्सेस, कूपनपास आणि बोर्डिंग पासचे ऑपशन मिळेल. म्हणजे पॉवर बटनचा वापर अनलॉकसाठीच असणार नाही. पॉवर बटन मेन्यूशी कनेक्टेड स्मार्ट होम डिव्हाईसला ऑपरेट करता येईल.

2 याम्ये यूजर्सला नोटिफिकेशन्स बबल्सच्या रूपात मिळतील. हे एकदम फेसबुक मेसेंजरप्रमाणे असेल. यामुळे फोनवर मल्टी टास्किंग करणे सोपे होईल. सोबतच नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये नोटिफिकेशन वेगवेगळे करता येईल. जरूरी मॅसेज मिस होणार नाही.

3 नोटिफिकेशनमध्ये डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करता येईल. सब मेन्यूत नोटिफिकेशन हिस्ट्रीसुद्धा मिळेल. यूजर्स आपल्या आवाजाद्वारे स्मार्टफोन कंट्रोल करू शकतात. सोबतच मीडिया कंट्रोलसाठी वेगळे क्विक टाइल दिले जाईल. नोटिफिकेशन हिस्ट्रीतू 24 तासातील आवश्यक मेसेज पहाण्याचे ऑपशन असेल.

4 यामध्ये नवा स्क्रीनशॉट यूआय दिला आहे, जो आयओएसशी मिळता-जुळता आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर यूजर्सना डावीकडे खाली शेयर आणि एडिट ऑपशन मिळेल. नेटिव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग सारखे फीचर सुद्धा मिळेल. तसे इन-बिल्ट व्हाईस रेकॉर्डिंगचे ऑपशन सुद्धा मिळेल.

5 शेयरिंग ऑपशन सेट करता येईल. ज्या शेयरिंग ऑपशनचा जास्त वापर करता, त्यांना साइड सेट करू शकता.

6 यामध्ये एयरप्लेन मोड ऑन केल्यानंतर वाय-फाय आणि ब्लूटूथ मोड बंद होणार नाही. यामुळे यूजर्सला चांगली सुविधा मिळेल.

7 तसेच यामध्ये सिक्युरिटीसाठी विशिष्ट कालावधीसाठी यूजन लोकेशन अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देऊ शकतो. म्हणजे यामध्ये परमिशन काही काळानंतर ऑटो रिसेट होईल.

8 यामध्ये डॉर्क मोडला अलार्मप्रमाणे सेट करू शकता. म्हणजे डॉर्क मोड रात्री 7 वाजतापासून सकाळी 5 वाजेपर्यंत सेट करू शकता, जे खुप चांगले ऑपशन आहे.

9 अँड्रॉइड 11 मध्ये कन्व्हर्सेशनला ग्रुप करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेजचा एक ग्रुप मॅसेज बनवू शकता. सोबतच या मॅसेजेना सायलेंट, डिफाल्ट आणि म्यूट प्रायव्हेटाईज करू शकता.