कर्तव्यदक्ष मार्शलमुळे तरुण गावठी पिस्तूलासह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गस्तीवर अशलेल्या मार्शलच्या सतर्कतेमुळे एका तरुणाला पिस्तूलासह अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ पिस्तूल २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

रोहित उर्फ किट्या दत्ता जाधव (वय १९, रा. महादेवनगर, हिंगणे खुर्द) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलीस ठाण्याच्या आनंदनगर चौकीतील मार्शल कर्मचारी शैलेश नेहरकर आणि लक्ष्मण काशिद हे दिवसपाळीवर गस्त घालत होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास  तरुण महादेव मंदिराच्या पायरीवर बसला असताना त्याच्या कमरेला पिस्तूल लावलेले दिसले. त्यानंतर त्याला पाठलाग करत पोलिसांना पाहून तो पळत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे एक पिस्तूल आणि २ काडतुसे मिळून आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. साळुंखे, पोलीस शिपाई दयानंद तेलंगे पाटील, आनंदनगर मार्शल पोलीस शिपाई शैलेश नेहरकर, लक्ष्मण काशिद यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा