बाथरुममध्ये पडलेल्या ‘त्या’ इजिनियरींगच्या तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

इजिनियरींगच्या खासगी क्लाससाठी आलेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन महिन्यांपुर्वी येरंडवना येथे मित्रांसोबत राहत असताना बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे मित्रांना दिसले होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला मृत्यू घोषित केले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9aaf8abe-c39c-11e8-9ff1-4be2fa43e82b’]

सौरभ सतिश गोंडाने (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आता डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होंर्डिंगच्या बेकायदा परवाना फी वसुलीला 4 वर्षांनी घेतली मंजुरी

सौरभ हा मध्यप्रदेशातील आहे. तो काही महिन्यांपुर्वी पुण्यात क्लाससाठी आला होता. तो आणि सांगली येथील 5 तरुण व तो एकत्र राहत होते. मात्र, 3 मार्च रोजी सौरभ हा मध्यरात्री बाथरुमला गेला. सर्व झोपले होते. सकाळी मित्र उठले असता त्यांना सौरभ बाथरुममध्ये पडल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. व पोलिसांना माहिती दिल्ली. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मित गुन्ह्यांची नोद केली होती. दरम्यान डॉक्टराकडुन गुरुवारी शवविछेद्नाचा अहवाल मिळाला. त्यात सौरभ याच्या डोक्यात कठिण वस्तूने मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B06XJP8QCV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adeb3efb-c39c-11e8-b284-5b926f3df211′]

कार-दुचाकी अपघातात २ जण जागीच ठार

वर्धा : कारंजा पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्ग कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमर दुपारे आणि अमर श्रीराम अशी मृतांची नावे आहेत. कारंजा येथील  पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जात असताना या दुचाकीचा अपघात झाला. नागपूरकडून अमरावतीच्या दिशेला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दुचाकीवरील अमोल दुपारे याचा जागीच मृत्यू झाला. अमर श्रीरामे याला रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यात तिसरा युवक सतीश कालभुत हा गंभीर जखमी असून त्याच्यावर नागपूर येथी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.