तरुणांनी वाचवले नदीच्या डोहात पडलेल्या नील गाईचे प्राण

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाइन (अरूण ठाकरे) – मुरबाड तालुक्यातील नारीवली – बांगरपाडा येथील नद्दीच्या डोहात पडलेल्या निलगायीचे प्राण वाचविण्यात नारीवली गावातील तरुण मुलांना यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पाणी टंचाईची झळ मुक्या प्राण्यांनाही जाणू लागल्याचे दिसून येत आहे.

जंगलात पाणी अटल्याने अनेक प्राणी गावा  शेजारी नदी- नाल्यावर येऊन आपली तहान भागवित  आहेत. अशीच एक निलगाय  जंगलातून आपली तहान भागवण्यासाठी नारीवली जवळील नदीवर आली होती. याही ठिकाणी नदी आटल्याने एका डोहात पाणी असल्याने ही निलगाय पाणी पिण्यासाठी गेली असता तीचा पाय घसरून ती डोहात पडली. तीला बाहेर  निघण्याचे साधन नसल्याने व जखमी झाल्याने ती आतच पडून होती. या ठिकाणी निलगाय डोहात पडल्याचे गावात वार्ता पसरताच कोणताही विचार न करता गावातील जेष्ठ नागरिक कमलाकर ठाकरे तसेच अनोज भोईर, अमोल भोईर, प्रदीप भोईर, पंकज गोडांबे, गोविंद भोईर या तरुणांने सकाळी ९ वाजेपासून तब्बल दोन तास प्रेयत्न करून तिला बाहेर काढले काही वेळ न घालवता मुरबाड वनखात्याला ही खबर दिली.

खबर मिळताच वनश्रेत्रपाल (मुरबाड) विकास भामरे यांनी आपले सहकारी वनपाल  एस. ओ. वाघचौडे, एम. एन. केंबारी, व वनरक्षक अमोल मोरे यांना बरोबर घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी व वनखात्याच्या मदतीने गाईला उचलून जखमी झालेल्या गायीला मुरबाड येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र शुक्रवार हनुमान जयंती सुटी असल्याने पशूवैद्दकिय अधिकारी उपलब्ध होऊ न शकल्याने या गायीच्या जखमांवर  हळद लाऊन वनखात्यानेच प्राथमिक उपचार सूरू केल्याने आज एका निलगायीचे प्राण वाचले आहे. निल गाईला वेळीच बाहेरकडून या तरुण पिढीचे वन्यप्राण्यांन वरील प्रेम दिसून येते.