धक्कादायक ! अवघ्या १० रुपयासाठी ‘त्याने’ केला तरुणाचा खून

बंगळूर : वृत्तसंस्था – पार्किंगच्या पैशावरून वाद झाल्याचे आपण अनेक ठिकाणी पाहत असतो. मात्र, यामुळे कुणाचा जीव गेल्याचे पहिले नसेल. परंतु बंगळूरमध्ये अशा प्रकारची घटना समोर अली आहे. येथे पार्किंगसाठी १० रु. देण्यावरुन झालेल्या वादावादीचे पर्यवसन दुचाकीस्वाराच्या खुनामध्ये झाले. भारतीनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली.

भरणीधरन (वय ३६, रा. अ‍ॅस्टीन टाऊन) असे मृताचे नाव आहे. भरणी हा सायंकाळी चारच्या सुमारास लावण्या चित्रपटगृहाजवळ गेला होता. त्याठिकाणी त्याने त्याची गाडी पार्क केली. त्यावेळी सेल्वम नामक युवक तेथे आला त्याने १०रु. पार्किंग शुल्क देण्याची मागणी केली. पण, भरणीने शुल्क देण्यास नकार दिला. यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सेल्वमने त्याला मारहाण केली. काहीजणांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सेल्वमने कुणाचेही ऐकले नाही.

मारल्यानंतर भरणीधरन हा खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या भरणीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.