तळवडेत दगडाने ठेचून तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – देहूरोड पोलीस ठाणाच्या अंतर्गत येणाऱ्या तळवडे गावातील स्मशानभुमीजवळ २५ ते ३० वयातील तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a612ec1-d03b-11e8-8b07-75f70ea3e7a8′]

तळवडे येथील स्मशानभुमी जवळ मृतदेह आढळला असून डोक्यात जखमा आहेत. तर दगडही बाजूला पडलेला आहे. त्यामुळे दगडाने ठेचून खून झाला असल्याचा पोलीसांचा संशय आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. तिन दिवसात परीसरात खुनाची दुसरी घटना आहे. यापूर्वी देहूगाव येथे तिघांनी एकावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडला होता. गणेश बलभीम बनगर (२१, रा. येलवाडी, खेड) याचा खून केला होता. तर अनिल उर्फ सोन्या अशोक घोलप, कुणाल संजय माने आणि अनिल कुऱ्हाडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

[amazon_link asins=’B0745D41JY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3374f20c-d03b-11e8-9bb7-b3f5419f234d’]

देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. माहितीनंतर तपासासाठी पोलीस पथके रवाना केली जाणार आहेत.

तलवार, चाकूचे वार करून भर दिवसा तरूणाचा खून