‘थर्टीफस्ट’ला जिल्ह्याचा ‘कारभारी’ ठरणार ! जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम जाहीर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निवडीचा कार्यक्रम आज सायंकाळी उशिरा जाहीर झाला आहे. 31 डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

31 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 01 या वेळेत नामनिर्देश भरणे, दुपारी 3 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या अर्जाची छाननी, त्यानंतर माघार आणि गरज भासल्यास निवडणूक असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेचे 73 सदस्य आहेत. नगर दक्षिणेतील 04 विधानसभा मतदारसंघ आणि नगर तालुक्यातील आहेत. उर्वरित जिल्हा परिषदेच्या 41 सदस्य हे उत्तर जिल्ह्यातील आहेत. यात संगमनेर आणि राहाता तालुक्यातील तब्बल 15 सदस्यांचे वर्चस्व आहे.

जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस पक्षाचे 23 सदस्य आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे 19, भाजप 14 तर शिवसेना 9 सदस्य आहेत. नेवाशातील क्रांतीकारी पक्षाचे 5, तर उर्वरित 4 सदस्य अपक्ष, अन्य छोटे पक्ष अथवा आघाडीचे सदस्य आहेत. किरण लहामटे आमदार झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे. त्यामुळे आता 72 सदस्य आहेत. सत्तेचे समीकरण कसे जमते, यावर आगामी राजकीय समीकरण अवलंबून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/