जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणूका लांबणीवर, राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत घेतले ‘हे’ १० महत्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापतीच्या निवडणूका लांबणीवर टाकण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुका देखील लांबणीवर टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

आजच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

१. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करून त्यासाठी १२८ पदे निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

२. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या समीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

३. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांना अर्थसहाय्यता वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.

५. जिल्हा पिरषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

६. विद्यापीठ विद्यार्थ्यी परिषदांच्या निवडणुकांबाबत निर्णय.

७. गडचिरोली जिल्ह्यातील मौजे नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा निर्णय.

८. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र.४ आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.

९. प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास मान्यता.

१०. तिरूपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याचा निर्णय.

आरोग्यविषयक वृत्त –