नवरा-बायकोच्या भांडणात भामट्याचा फायदा, लाखाचे दागिने लंपास

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन – नवरा बायकोमधील सततचे वाद सोडवून देण्याच्या बहाण्याने एका भमट्याने एका महिलेचे १ लाख ९ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या भामट्याला गजाआड केले.

ही घटना मंडई येथील स्वामी समर्थ मठ आणि खंडोबा मदिरात मार्च २०१८ ते एप्रिल २०१८ दरम्यान घडली.लोकेश प्रभाकर दिवेकर (वय-४६ रा. परिहार चौक, औंध, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला ही दररोज स्वामी समर्थ मठामध्ये दर्शनाकरिता जात होत्या. दरम्यान त्यांची ओळख आरोपी लोकेश दिवेकर याच्याशी झाली. दररोजच्या भेटीमुळे त्यांच्यात चांगली ओळख झाली. फिर्य़ादी महिलेने पतिसोबत सतत भांडण होत असल्याचे आरोपीला सांगितले. याचा फायदा घेऊन महिलेला नृसिंह व लघुरुद्रा जप केल्यासा ही अडचण दूर होईल तसेच त्याच्या भावाचा देखील अशीच होती.

ती दूर झाली असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. ही पूजा करण्यासाठी पताने घातलेले दागिने यासाठी लागतील असे सांगून खंडोबाच्या मंदिरात भेटण्यास सांगितले.फिर्यादी महिलेने त्याच्यावर विश्वास ठेऊन २४ एप्रिल रोजी घरातील १ लाख ९ रुपये किंमतीचे दागिने घेऊन खंडोबा मंदिरात आरोपीची भेट घेतली. या ठिकाणी पूजा करण्याच्या बहाणा करुन आरोपीने फिर्यादी महिलेला ११ प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्या. दरम्यान, त्याने दागिने लंपास करुन रुमालात लिंबू ठेवून रुमाल आठ दिवसांनी उघडण्यास सांगितले.

आठ दिवसांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने नसून लिंबू होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बापु रायकर करीत आहेत.