इरफान खानची आठवण काढत पत्नी सुतापा सिकदरनं शेअर केली ‘भावूक’ पोस्ट, म्हणाली – ‘मी तिथं भेटेल’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार इरफान खाननं जगाचा निरोप घेऊन 1 महिना झाला आहे. पत्नी सुतापा सिकदरनं पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर करत सर्वांना भावूक केलं आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफाननं जगाचा निरोप घेतला होता. एक महिना पूर्ण झाल्यानंतर आता सुतापानं काही अनसीन फोटो शेअर करत त्याची आठवण काढली आहे.

सुतापानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “इथून खूप दूर प्रत्येक चूक आणि बरोबरच्या पुढे एक रिकामं मैदान आहे. मी तिथं भेटेल तुला. जेव्हा आपला आत्मा गवतावर सुखाने झोपेल आणि जग बोलून थकून जाईल. काही वेळाचीच ही बाब आहे. भेटूयात बोलूयात. तुला पुन्हा भेटेपर्यंत.”

''Out beyond ideas of wrongdoing and rightdoing there is a field. I'll meet you there. When the soul lies down in that…

Geplaatst door Sutapa Sikdar op Vrijdag 29 mei 2020

सुतापानं जे 2 फोटो शेअर केले आहेत त्यात सुतापा आणि इरफान एका पार्कमध्ये दिसत आहेत. एका फोटोत इरफान गवतावर झोपलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सुतापा आणि इरफान सेल्फी घेत आहेत.

सुतापानं शेअर केलेली इमोशलन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक चाहतेही भावूक झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like