धक्कादायक ! पेन चोरी केल्यावरून दोन अल्पवयीन मुलींमध्ये वाद, एकीनं दुसऱ्या मुलीच्या डोक्यात केले 19 ‘वार’ !

जयपूर : वृत्तसंस्था – शाळेत पेन चोरी करण्यावरून आठवीच्या अल्पवयीन मुलींमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी विद्यार्थिनीनं (10 वर्षे) आपल्या घरी आलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या (वय 13) डोक्यात लोखंडी रॉडनं 19 वार केले. यात त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी मुलीनं दुसऱ्या मुलीचा मृतदेह बेसमेंटमध्ये लपवला. यानंतर तिनं सर्व घटना आईला सांगितली. यानंतर आई आणि त्या आरोपी मुलीनं मिळून मुलीचा मृतदेह पाण्यात फेकून दिला. शनिवारी जयपूर पोलीसांनी खुनाच्या आरोपाखाली 10 वर्षीय मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना अटक केली.

नेमकं काय झालं ?
डीसीपी अशोक गुप्ता यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “चाकसूच्या बडली गावात राहणारी विद्यार्थिनी दुपारी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी घराच्या जवळपास 500 मीटरच्या अंतरावर झुडपामध्ये एक मृतदेह सापडला. तपासात समोर आलं की ती आरोपी मुलीच्या घरी जाते असं सांगून घरातून गेली होती. जेव्हा पोलीसांनी आरोपी मुलीच्या घरच्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ती मुलगी त्यांच्याकडे आलीच नव्हती. कारण दोघांमध्ये भांडणं सुरू आहेत. यानंतर पोलीसांना संशय आला. पोलीसांनी घराची झडती घेतल्यानंतर पोलीसांना तिथे मृत मुलीच्या कानातील बाळी सापडली. कसून चौकशी केल्यानंतर 10 वर्षीय मुलीनं गुन्हा कबूल केला.”

आरोपीच्या मुलीच्या आईनं मृतदेह तलावात फेकला, बापानं काढला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा आरोपी मुलीच्या आईला घटनाक्रम समजला तेव्हा तिनं मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला. मृतदेह फुगून वर येऊ नये यासाठी त्यात काही दगडही टाकले होते. यानंतर महिलेनं पतीला ही घटना सांगितली. तिच्या पतीनं म्हणजेच आरोपी मुलीच्या बापानं तिला मोक्ष न मिळाण्याचं बोलत मृतदेह तलावातून काढला आणि झुडपात फेकून दिला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like