महाराष्ट्रात नोटबंदीमुळे १५ लाख कामगार बेरोजगार झाले : शरद पवार

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन – स्वीस बँकेतील पैशाचे काय झाले असा सवाल करत शरद पवार यांनी आज रविवारी नोटबंदीच्या निर्णयाची दाहकता आपल्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्विझर्लंडमध्ये जाऊन तेथील बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन देखील काळा पैसा येणार नाही हे लक्षात आल्यावर मोदींनी देशावर नोटबंदी थोपली. या नोटबंदीत १०० लोकांचे मृत्यू झाले. तर एकट्या महाराष्ट्रात १५ लाख लोक बेरोजगार झाले असे शरद पवार म्हणाले

चाकण येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला शरद पवार संबोधित करत होते. शिरूरचे लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शरद पवारांच्या हस्ते चाकण येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

मोदींना मी म्हणालो, काळा पैसा आणण्याचे काय झाले तुम्ही तर स्वीजर्लन्डला जाऊन आलात. तेव्हा मोदी मला म्हणाले होते कि तुम्ही बघाच एक दिवस आम्ही काळ्या पैशावर चांगलाच चाप लावू. मोदींना काळ्या पैशाबाबत काहीच करता आले नाही म्हणून त्यांनी देशावर नोटबंदी लादली आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.