तामिळनाडूत भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 19 ठार तर 20 जखमी

कोयंबटूर : वृत्त संस्था – तामिळनाडुमधील कोयंबटूर अविनाशी येथे लॉरीने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या व्हॉल्वो बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंडक्टरसह १९ जणांचा मृत्यु झाला आहे. पहाटे सव्वा तीन वाजता हा अपघात झाला. बंगळुरुहून केरळमधील एनार्कुलमकडे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (केएसआरटीसी) व्हॉल्वो बस जात होती.

बसमध्ये ५० प्रवासी होते. कोइमतूर – सेलम महामार्गावर केरळमधील एक ट्रक समोरुन येत होता. तो पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी ट्रकचालकाने नियंत्रण सुटले व त्याने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या बसला जोरात धडक दिली़ त्यात बसची उजवी बाजू संपूर्ण कापली गेली.
या अपघातात १९ जणांचा मृत्यु झाला असून त्यात १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.