Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 165 नवीन रूग्ण, महाराष्ट्रातील आकडा 3081 वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही संख्या जास्त आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढताना दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्रात नव्या १६५ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. महत्वाची बाब म्हणजे यापैकी १०७ मुंबई येथील आहेत तर २३ नवे रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. तर या वाढलेल्या रुग्णांमुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता ३०८१ वर पोहचला आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

अशी आहे आकडेवारी

याबाबत माहिती अशी की, आज अपडेट झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई येथे सर्वाधिक १०७ रुग्णांची नोंद झाली आहे. माहितीनुसार नवी मुंबई -२ ,वसई विरार -२, ठाणे जिल्हा -१,ठाणे -३, पीएमसी -१९, पीसीएमसी -४,पनवेल -१,नागपूर -१०,नागपूर १,एमसीजीएम-१०७, मालेगाव -४, चंद्रपूर -१, अहमदनगर -१
महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधिताची संख्या अशी आहे.

मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत डॉक्टरांची टीम जाऊन तपासणी करीत आहे, जिथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत ते भाग सील करण्यात आले आहेत. मुंबईतील काही भागात रँडम टेस्ट मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळात लोक घराबाहेर पडू नयेत याकरिता विशेष काळजी घेण्यात येत आहे.

पुण्यातील भाग सील

पुण्यात देखील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील २२ पेक्षा जास्त भाग सील करण्यात आले आहेत . खडक, बंडगार्डन, विश्रांतवाडी, खडकी आणि येरवडा पोलीस ठाण्याचे बहुतांश भाग तर सिंहगड रोडवरील राजीव गांधी नगर, दत्तवाडीमधील पर्वती-शिवदर्शन, वारजेमधील रामनगर-गोकुळनगर-तिरुपतीनगर आणि कोथरूडमधील केळेवाडी-सुतारदरा-जयभवानीनगर हे भाग सील करण्यात आले आहेत.