‘या’ जिल्ह्यातून १७ समाजकंठक तडीपार 

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील १७ समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५ जणांना एक वर्षासाठी, तर ५ जणांना सहा महिन्यांसाठी आणि ७ जणांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी काल (१८ फेब्रुवारी) ला हे आदेश दिले आहेत.

१९ फेब्रीवरी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. यानिमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण शहरांमध्ये उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते, मिरवणुका, आयोजित व्याख्याने, असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, आणि विशेष म्हणजे आगामी निवडणुकाही काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेला बाधा पोहचुनये म्हणून शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या समाजकंठकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असते. म्हणूनच अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील १७ समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये, सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत सूरज गजानन नाईक, उमेश अंबादास अटाळकर, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत कुणाल मनोज निंदाणे, रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत जॉन ऊर्फ रवी रमेश गोवर व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत अक्षय श्रीकृष्ण तेलगोटे या पाच जणांना एक वर्षासाठी. तसेच सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत अक्षय रामदास भगत, नागेश ब्रह्मदास खंडारे, डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत सचिन वाल्मीक खंडारे, सोनू भिकाजी मानकर व अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत सचिन मुकुंद बलखंडे या पाच जणांना सहा महिन्यांसाठी. याचबरोबर डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत अलिमशहा कलीमशहा, लड्ड्या ऊर्फ उमर शेख हारुण, शेख कासम शेख इब्राहिम, एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत सुबोध राजेंद्र ठोके, जूने शहर पोलीस ठाणे अंतर्गत सुनील उत्तमराव पाचपोर, प्रशांत नानासाहेब खोरे व अकोट फल पोलीस ठाणे अंतर्गत प्रकाश बळीराम वानखडे या सात जणांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.