कोथरूडमध्ये ऐन दिवाळीत २० मजली इमारतीच्या बांधकामावरील पाळणा तुटल्याने दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन :  २० मजली इमारतीच्या बांधकामावर पाळणा तुडून त्यात दोन कामगार जागीच ठार झाले आहे. ही घटना सव्वा बारा वाजता कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराजवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घडला.

अग्निशामक दलाची रेस्क्यु व्हॅन व रेग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या डोंगराच्या बाजूला एका २० मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीचे रंगकाम व इतर काम सुरु आहे. या ठिकाणी कामगारांसाठी पाळणा उभारुन रंग देण्याचे काम सुरु होते.

काम सुरु असताना अचानक पाळणा तुटला व त्यावरील दोन कामगार वरुन थेट खाली कोसळले. त्यात हे कामगार जागीच ठार झाले आहेत. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. पाळणा मध्येच अडकला असून तो खाली उतरविण्याचे काम कामगारांच्या मदतीने अग्निशामक दलाचे जवान करीत आहेत.

Visit : policenama.com