सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’, 2 मुलींचा 24 हजारात ‘सौदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातच्या राजधानीत म्हणजेच शिमल्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला. यात सहभागी दोन मुलींसह आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना माहिती मिळाली होती की एक व्यक्ती शिमलामध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली सप्लाय करतो. यानंतर पोलिसांनी वेशांतर करुन ग्राहक बनून मुलींचा सप्लाय करणाऱ्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवरुन संपर्क केला. या व्यक्तीने एका रात्रीसाठी 24,000 रुपयांमध्ये दोन मुली सप्लाय करुन असे सांगितले. सौदा म्हणून त्या व्यक्तीला 10 हजार रुपये ऑनलाइन देण्यात आले. सौदा करणाऱ्या व्यक्तीने दोन मुलींना ग्राहकापर्यंत पोहचवले. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ज्या गाडीतून तरुणींना पाठण्यात आले होते ती गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी वरिंदर सिंह हा जीरकपूर मोहाल येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात महिला तस्करी कायद्याविरोधांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी अचानक धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या स्पा सेंटरमधून थायलंडहून आलेल्या सहा तरुणींची सुटका केली होती.

या सर्व मुली पर्यटन आणि बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. पोलिसांनी या छाप्यात लॅपटॉप, स्वाईप मशिन, 1.23 लाख रुपयांची रक्कम, काही कागदपत्रे आणि तीन वाऊचर बुक जप्त केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –