शिराळ्यात देशी बनावटीची २ पिस्तूल जप्त, एकाला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील शिराळा येथील कापरी फाटा येथे एकाला सोमवारी अटक करण्यात आली. राहुल तानाजी ठोमके (वय ३३, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ देशी बनावटीची पिस्तूल, २ काडतुसे असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक शिराळा परिसरात गस्त घालत होते. निरीक्षक पिंगळे यांना शिराळ्यातील कापरी फाटा येथे एक युवक पिस्तूल विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने कापरी रस्ता परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून संशयित राहुल ठोमके पळून जाऊ लागला. त्यावेळी पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ देशी बनावटीची दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे सापडली. ती जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, चेतन महाजन, सचिन कनप, जीतू जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक