‘नकली’ तर नाहीत ना तुमच्या खिशातील 2000 आणि 500 रुपयांच्या नोटा, असं तपासा आणि खात्री करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरक्षेच्या कारणांसाठी 2000 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. या नोटांमध्ये सिक्यूरिटी फिचर्स पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या करण्यात आल्या आहेत, जेणेकरून नकली नोटांचा निकाल लावता यावा. परंतु, हे नवे सिक्युरिटी फिचर्स या नव्या नोटांमध्ये समाविष्ठ करूनही मागील दोन वर्षात असे रिपोर्ट समोर आले, ज्यामध्ये सांगितले गेले की, नकली नोटा पुन्हा एकदा बाजारात पसरवल्या जात आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांनी खिशातील 500 आणि 2000 रूपयांच्या नोटा व्यवस्थित तपासणी गरजेचे ठरते. आज आम्ही तुम्हाला आरबीआयने जारी केलेल्या या नोटांच्या फिचर्सबाबत माहिती देणार आहोत, जेणेकरून नकली आणि खर्‍या नोटांमधील फरक तुम्ही समजू शकता.

एसबीआयने दिला सावधगिरीचा इशारा

नुकतेच आरबीआयने एक ट्विट करून ग्राहकांना सावध केले आहे की, नकली आणि खर्‍या नोटांमधील फरक ओळखावा. आरबीआयने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुम्ही तुमच्याकडील नोटा काळजीपूर्वक पहा आणि याची खात्री करा की या नोटा खर्‍या आहेत. यामध्ये एक फोटोसुद्धा दिला आहे, ज्याद्वारे ग्राहकांना खरी आणि खोटी नोट यातील फरक समजू शकतो. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवरदेखील ही माहिती दिली आहे.

कसा ओळखाल 2000 रुपयांच्या नकली आणि खर्‍या नोटमधील फरक?

1. 2000 रूपयांच्या नोटेवर सर्वात डावीकडे 2000 लिहिले आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला नोट उजेडात धरावी लागेल.

2. जेव्हा नोट तुम्ही 45 डिग्रीच्या अँगलमध्ये धराल तर नोटेच्या डावीकडे 2000 अंकात लिहिलेले आहे.

3. या नव्या नोटमध्ये नवे फिचर समाविष्ठ करण्यात आले आहे. नोटेवर देवनागरीत मुल्य लिहिले आहे.

4. नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे.

5. हे फिचर केवळ मायक्रोस्कोपच्या मदतीनेच दिसू शकते. महात्मा गांधींचा फोटोनंतर आरबीअय 200 लिहिलेले असेल.

6. महात्मा गांधींच्या फोटोजवळ विंडो थ्रेड निळ्या आणि हिरव्या रंगात बदलताना दिसतात. दोन्ही रंगातील हा बदल तेव्हा दिसेल जेव्हा नोट थोडी तिरकी केली जाईल.

7. खर्‍या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरद्वारे दिलेली गॅरेंटी असेल. जर एखाद्या नोटेवर हे नसेल तर त्या नोटेचे मुल्य नसते. सध्याच्या नोटांवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकान्त दास यांची सही असेल. हे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत असते.

8. नोटेच्या वॉटरमार्क सेक्शनमध्ये महात्मा गांधींचा एक फोटो आहे. तो नोटेच्या उजव्या बाजूला असेल.

9. नोटेच्या वरील उजव्या भागात नंबर पॅनलवर आणि उजव्या बाजूला खाली युनिक कोड असेल. प्रत्येक नोटेवर हा क्रमांक वेगळा असतो.

10. नोटेच्या उजव्या बाजूला रुपयाच्या साईनसह नंबर दिलेला असतो. हा नंबर नोट तिरकी केल्यानंतर हिरवा ते निळ्या रंगात बदलतो.

11. नोटेच्या सर्वात उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.

12. नोटेवर हॉरिझेंटल रेक्टँगलच्या आकारात 2000 लिहिलेले असेल. या लिखानात थोडा उंचवटा आहे. नेत्रहीन लोकांसाठी ही व्यवस्था आहे.

13. 2000 रुपयांच्या नोटेच्या दोन्ही बाजूला बॉर्डरवर 7 रेषा आहेत. यातही थोडा उंचवटा आहे.

14. नोटेच्या मागे, डाव्या बाजूला नोट प्रिंट केल्याचे वर्ष असते.

15. नोटेच्या मागच्या भागात डावीकडून खाली स्वच्छ भारतची निशाणी आणि स्लोग प्रिंट आहे.

16. नोटेच्या मागच्या भागात डाव्या बाजूला एक बॉक्स असून, त्यामध्ये विविध भाषांमध्ये नोटेचे मुल्य लिहिलेले आहे.

17. मागील बाजूस मोठ्या भागात इस्त्रोच्या मंगळयानाचा फोटो आहे.

18. नोटेच्या मागच्या भागात डाव्या बाजूस देवनागरी स्क्रिप्टमध्ये नोटेचे मुल्य लिहिलेले आहे.

 अशी ओळखा 500 रुपयांची खरी नोट

1. पाचशे रुपयांच्या नोटमध्ये सर्वात डाव्या बाजूला 500 लिहिलेले आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला नोट प्रकाशात धरावी लागेल.

2. नोट 45 डिग्रीच्या अँगलमध्ये धरल्यास नोटेच्या डाव्याबाजूला 500 अंकात लिहिलेले आहे.

3. या नोटेत नवे फिचर समाविष्ठ करण्यात आले आहे. नोटेवर देवनागरी स्क्रिप्टमध्ये नोटेचे मुल्य लिहिलेले आहे.

4. नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे.

5. हे फिचर केवळ मायक्रोस्कोपच्या मदतीने दिसू शकते. महात्मा गांधींच्या फोटोनंतर आरबीआय आणि 500 लिहिलेले आहे.

6. महात्मा गांधींच्या फोटोजवळ विंडो थ्रेड निळ्या आणि हिरव्या रंगात बदलताना दिसते. दोन्ही रंगामधील हा बदल तेव्हाच दिसू शकतो जेव्हा नोट थोडी तिरकी केली जाईल.

7. खर्‍या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हार्नरकडून देण्यात आलेली गॅरंटी आहे. जर नोटेवर ही नसेल तर तिचे कोणतेही मुल्य असणार नाही. सध्या आरबीआय गव्हर्नर शक्तिकान्त दास यांची सही असेल. ही इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये आहे.

8. नोटेच्या वॉटरमार्क सेक्शनमध्ये महात्मा गांधींचा फोटो आहे. हा नोटेच्या उजव्या बाजूला आहे.

9. नोटेच्या टॉप लेफ्ट सेक्शनमध्ये नंबर पॅनलवर आणि उजव्या बाजूला सर्वात खाली यूनिक कोड आहे. प्रत्येक नोटेवर तो वेगवेगळा असतो.

10. नोटेच्या उजव्या बाजूला रुपयाच्या साईनसह नंबर दिलेला आहे. हा नंबर नोट तिरकी केल्यानंतर हिरव्यातून निळ्या रंगात बदलतो.

11. नोटेच्या सर्वात उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.

12. नोटेवर हॉरिझेंटल रेक्टँगलच्या आकारात 500 लिहिलेले आहे. या लिखानात थोडा उंचवटा आहे, जेणेकरून नेत्रहीन लोकांना खर्‍या आणि खोट्या नोटेतील फरक समजावा.

13. या नोटेच्या दोन्ही बाजूला बॉर्डरवर 5 रेषा असून त्यासुद्धा हलक्या उंचवट्याच्या आहेत.

14. नोटेच्या मागच्या बाजूला, डाव्या बाजूला नोट प्रिंट केल्याचे वर्ष आहे.

15. नोटेच्या मागच्या भागात डाव्या बाजूस सर्वात खाली स्वच्छ भारतची निशाणी आणि स्लोग प्रिंट आहे.

16. नोटेच्या मागील भागात डाव्याबाजूला एक बॉक्स असून त्यामध्ये विविध भाषांमध्ये नोटेचे मुल्य लिहिलेले आहे.

17. मागील भागात ऐतिहासिक लाल किल्ल्याचा फोटो आहे.

18. नोटेच्या मागच्या भागात उजव्या बाजूला, देवनागरी स्क्रिप्टमध्ये नोटेचे मुल्य लिहिलेले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like