पुण्यात खळबळजनक ‘झेंगाट’? ! २३ वर्षीय युवकावर ॲसिड हल्ला ; फायरींग झाल्याचा संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सदाशिव पेठेत एक खळबळजनक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. एका २३ वर्षीय तरुणावर असिड हल्ला झाला आहे. पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली त्यांना हा प्रकार कुठे घडला हेच समजत नव्हते पण काही पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना झाली कुठे हे शोधले आणि धक्कादायक माहिती समोर आली.

रोहित खरात (२३, रा.१६२०, सदाशिव पेठ, पुणे) हा या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची तब्बेत गंभीर आहे. रोहित याच्या आईने एका तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती आणि त्यानेच हे केले आहे असा संशय आहे. ही घटना सदाशिव पेठ येथे घडली आहे. रोहित याच्या तोंडावर आणि पाठीवर ऍसिड टाकण्यात आले आहे. ही घटना ‘झेंगाट’ मधून झाली असल्याचे समजते. पोलीस अधिकाऱ्यांनी तापस सुरू केला आहे.

फायरिंग करणाऱ्या आरोपींने स्वतःला गोळी मारून घेतली त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला, आरोपीचे नाव सिध्दनाथ कलशेट्टी,  राहनार अक्कलकोट असे आहे.

Loading...
You might also like