Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 264 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता कोरोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासांत 264 नवे कोरोना बाधित पोलीस आढळून आले आहेत. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 11 हजार 932 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 9 हजार 187 पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या राज्यामध्ये 2 हजार 84 जणांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील 11 हजार 392 कोरोना बाधित पोलिसांमध्ये 1 हजार 179 अधिकारी व 10 हजार 213 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या अ‍ॅक्टव्ह पोलिसांपैकी 257 अधिकारी व 1 हजार 827 कर्मचारी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 9 हजार 392 पोलिसांमध्ये 911 अधिकारी व 8 हजार 276 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 121 पोलिसांमध्ये 11 अधिकारी व 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात मागील 24 तासामध्ये 11088 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 35 हजार 601 इतकी झाली आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 48 हजार 553 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 10014 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 3 लाख 68 हजार 435 रुग्ण बरे होऊन दावाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत.