फ्रान्समधील चर्चवर हल्ला : 3 लोकांची हत्या, महिलेचे शिरच्छेद, महापौर म्हणाले – ‘हे आतंकवादी हल्ल्याप्रमाणे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पैगंबर कार्टूनच्या वादात फ्रांन्समध्ये शिक्षकेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्यानंतर आता अशीच आणखी एक हत्या प्रकरण समोर आले आहे. फ्रान्सच्या एका चर्चमध्ये हल्लेखोरांनी महिलेचा गळा कापला आणि दोन इतर लोकांची चाकू मारुन निर्दयपणे हत्या केली. ही घटना फ्रान्समधील नाइस शहरात घडली आहे. शहरातील महापौरांनी या भयानक घटनेला आतंकवाद हल्ला म्हटले आहे.

शहराच्या नॉट्रे डेम चर्चमध्ये चाकू हल्ला झाल्याचे महापौर क्रिश्चियन इस्टोर्सी यांनी सांगितले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, तिघांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. इतर बरेच जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, महिलेचा गळा कापला गेला आहे. एका फ्रेंच नेत्यानेही या महिलेचा गळा कापल्याची पुष्टी केली आहे.

चर्चला घेरले आहे

फ्रान्सच्या आतंकवादविरोधी विभागाने सांगितले की, या हल्ल्याची चौकशी करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. घटनास्थळी उपस्थित पत्रकारांचे म्हणणे आहे की, सशस्त्र सैनिकांनी चर्चला घेरले आहे. यावेळी रुग्णवाहिका व अग्निशमन सेवेची वाहने उपस्थित आहेत. हा हल्ला अशा वेळी घडला आहे जेव्हा पैगंबरचे कार्टुन दाखवताना फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. चर्चमध्ये चाकूने हल्ला करुन लोकांची हत्या करण्यामागील हेतू काय होता किंवा पैगंबरचे कार्टूनशी काहीतरी संबंध आहे हे अद्याप कळू शकले नाही. यापूर्वी फ्रान्समध्ये पैगंबरचे कार्टून पाहिल्यावर एका शिक्षकेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोकळेपणाने बोलण्याचे आणि धर्माची उपहास करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले आहे. मात्र, त्यानंतर ते मुस्लिम देशांच्या टीकेचे बळी ठरले आहे.

You might also like