चालकाला मदत मागून 3 महिलांनी पळवला टेम्पो 

ADV
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – रात्री हायवेर तीनही महिला म्हणून त्यांना मदत करणे त्यांना घरापर्यंत सोडणे एका टेम्पोचालकाला चांगलेच महागात पडले आहे. त्याने त्यांना घरी सोडावे म्हणून मदत केली मात्र महिलांनी त्याच्यासोबतच वाद घालून छेडछाड व इतर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. घाबरलेला चालक मदतीसाठी थोड्या अंतरावर जाताच महिलांनी दुसरीकडे अडीच लाख रुपयांचा टेम्पो लांबवल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे घडला.

चालकाने पाच दिवसांनंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी अप्पासाहेब डिगोळे (२९, रा. भालगाव ) हे रात्री बारा वाजेच्या सुमारास टेम्पोने (एमएच २० ईजी ७३५६) जात होते. या वेळी केंब्रिज चौकातील रेल्वे पुलाजवळ तीन महिला वाहनाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महिलांनी त्यांना गुरू लॉन्सच्या मागील बाजूस सोडण्याची विनंती केली.

भाडे ठरवून डिगोळे यांनी त्यांना टेम्पोत बसवले. बीड बासपासवरील गुरू लॉन्सजवळील निर्मनुष्य परिसरात सोडल्यानंतर महिलांनी त्यांच्यासोबत पैसे देण्यावरून वाद घातला. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर छेडछाडीचा गंभीर आरोप देखील करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या डिगोळे यांनी मदत मागण्यासाठी गुरू लॉन्सच्या गेटकडे धाव घेतली. तेवढ्यात महिलांनी त्या चालकाचा टेम्पो पळवला.

ADV

महिलेने परिधान केली होती जीन्स…

गाडी पळवणारी एक महिला अंदाजे ३५ वयोगटाची असून तिने जीन्स, टी-शर्ट परिधान केलेला होता. तर इतर दोन महिला अंदाजे २८ वयोगटाच्या आसपास होत्या, त्यांनी पंजाबी ड्रेस परिधान केलेला होता, असे चालक डिगोळे यांनी पोलिसांना सांगितले.