आधी लव्ह मॅरेज नंतर 32 वर्षांचा ‘दुरावा’, अशी आहे ‘बबीता-रणधीर कपूर’ची लव्ह स्टोरी !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांचे आई वडिल बबीता आणि रणधीर कपूर बी टाऊनधीलर चर्चित कपल होतं. याचं कारण म्हणजे त्यांच्यातील प्रेमच नाही तर त्यांचं वेगळं होणंही आहे. अॅक्ट्रेस बबीता कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव स्टोरीबद्दल आणि इतरही अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

जुन्या काळातील प्रसिद्ध अॅक्ट्रेस बबीताचा जन्म 20 एप्रिल 1947 रोजी झाला होता. तिचं नाव बबीता हरि शिवदसानी आहे. 1976 साली आलेल्या दस लाख या सिनेमातून बबीतानं डेब्यू केला होता. 1969 मध्ये रणधीर कपूर आणि बबीता यांची संगम सिनेमाच्या सेटवर भेट झाली. रणधीर पिता राज कपूरसोबत आले होते.

दोघांमध्ये हळहळू भेटी वाढू लागल्या. जवळीकता वढू लागली. दोन वर्ष ते चोरून भेटू लागले. दोघांनी 1971 साली आलेल्या कल आज और कल या सिनेमात एकत्र काम केलं. त्याच वर्षी म्हणजेच 6 नोव्हेंबर 1971 रोजी त्यांनी लग्न केलं.

कपूर रेसिंडेंसमध्ये दोघांनी पंजाबी पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर कपूर परंपरेनुसार बबीतानं अॅक्टींग सोडून दिली. 1974 साली करिश्माचा जन्म झाला. याच दरम्यान रणधीरचंही करिअरच रूळावरून खाली उतरू लागलं. यानंतर 1981 साली करीनाचा जन्म झाला. यावेळी रणधीरची आर्थिक स्थिती डगमगली होती. त्यांचे सिनेमेही बॉक्स ऑफिसवर प्लॉप होऊ लागले. याच काळात बबीता आणि रणधीरच्या नात्यात कटुता येऊ लागली.

1987 साली बबीातनं रणधीरपासून वेगळं होण्याचं ठरवलं. 1988 पर्यंत दोघं वेगळे राहिले. रणधीर आपल्या पॅरेंटसोबत राहू लागले आणि बबीता करीना आणि करिश्माला घेऊन राहू लागली. लग्नाच्या 15 वर्षांनी हे कपल वेगळं झाल्यानं सारेच चकित झाले होते. तसं आजही दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही.

https://www.instagram.com/p/BtllHgRluEv/

वेगळं झाल्यानंतर बबीतानं मुलींना यशस्वी बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मेहनतीचं फळ होतं की, 1991 मध्ये करिश्मानं प्रेम कैदी हा सिनेमा केला जे कपूर खानदानाच्या परंपेरच्या विरोधात होतं. यानंतर 1999 साली करिनानं रिफ्युजी सिनेमातून डेब्यू केला. दोघींचंही करिअर यशस्वी आहे.

https://www.instagram.com/p/BqG85svAh2w/

बबीता आणि रणधीर यांनी कधीच भेटण्याचा प्रयत्न केला नाही. 2000 नंतर त्यांच्या थोडं बोलणं होऊ लागलं. 2007 मध्ये दोघांनी मतभेद बाजूला ठेवत एक नवीन सुरूवात केली. आजही दोघं वेगळेच आहेत. परंतु आता त्यांच्यात कोणताही परकेपणा नाही. दोघं एकत्र पार्टी अटेंड करतात.

https://www.instagram.com/p/B7TNdIHFTuy/

https://www.instagram.com/p/B5AaGTaj4dY/

https://www.instagram.com/p/B-8wrm_lMpF/

https://www.instagram.com/p/Bg9bSZ9AV3s/