राज्यातील 23 हजार तरुणांना मिळणार रोजगार, येणार 35 हजार कोटींचे प्रोजेक्ट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात ३४ हजार ८५० कोटिकच्या उद्योगांची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे २३ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सोमवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्यात एक लाख कोटी गुंतवणूक करण्याचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुखमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी अनबलगण आणि गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा क्षेत्रातील उद्योग गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्याबाबतीत देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीतून हि बाब समोर आली आहे. यानुसार ऑकटोम्बर महिन्यात बेरोजगारीचा दर ६.९८ टक्के एवढा होता. सप्टेंबर मध्ये तोच ६.६७ पर्यंत आला.