अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीसह ‘या’ 5 अभिनेत्रींनी केलयं सुसाईड ! कोणी 26 व्या तर कोणी 24 व्या वर्षी संपवलं आयुष्य

पोलीसनामा ऑनलाईन :आजच्या दिवशी 4 वर्षांपूर्वी 1 एप्रिल 2016 रोजी टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं सुसाईड केल होतं. तिच्या सुसाईडची बातमी समोर आल्यानंतर 1 एप्रिल असल्यानं आधी तर अनेकांना हे खरंच वाटलं नाही. 24 वर्षीय प्रत्युषानं आपल्या राहत्या घरात सुसाईड केलं होतं. जमशेदपूरच्या प्रत्युषानं बालिका वधू मालिकेत आनंदीचा रोल केला होता. बिग बॉस 7 मध्येही ती दिसली होती. तिच्या मृत्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड राहुल राजला जबाबदार धरलं गेलं होतं. एखाद्या अॅक्ट्रेसनं अशा प्रकारे सुसाईड करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत.

1) नफीसा जोसेफ- 12 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात करणाऱ्या नफीसा जोसेफनं 29 जुलै 2004 रोजी सुसाईड केलं होतं. ती तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली होती. बिजनेसमन गौतम सोबत तिचं लग्न होणार होतं. 26 वर्षीय नफीसाचं लग्न रद्द झालं. तिनं C.A.T.S या टीव्ही सीरिजमध्ये तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6u5hBBFRxZ/

2) कुलीजत रंधवा- 8 फेब्रुवारी 2006 रोजी कुलजीतनं सुसाईड केलं. कुलजीत केवळ टीव्हीमध्येच नाही तर सिनेमातही काम करत होती. तिनं बॉयफ्रेंडसाठी सुसाईड नोट लिहली होती. तिनं लिहिलं की, तिला आयुष्याचा प्रेशन सहन होत नाहीये. 30 वर्षीय कुलजीतनं तिच्याच फ्लॅटमध्ये गळफास घेतला होता.

3) विवेका बाबाजी- 37 वर्षीय अभिनेत्रीनं 25 जून 2010 रोजी मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घातला होता. विवेका डिप्रेशनमध्ये होती. शेवटी तिनं आपल्या डायरीत लिहलं की, “तू मला मारलंस गौतम वोहरा.” गौतम तिचा एक्स बॉयफ्रेंड होता.

4) दिशा गांगुली- 22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री दिशानं 9 एप्रिल 2015 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. असं सांगितलं जातं की, दिशा तिच्या फीमेल कोस्टार सोबत रिलेशनशिपमध्ये होती.

5) सेजल शर्मा- सेजलनं 24 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 27 वर्षीय सेजल हॅप्पी या मालिकेत दिसली होती.